जामूनझीरा पाड्यावर बालकास सर्पदंश ; प्रकृती गंभीर

hqdefault 1

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी जामुनझीरा पाडयावर राहणाऱ्या एका बालकास आज विषारी सर्पाने दंश केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. प्रकृती खालावल्याने प्रथमोउपचार करून बालकास जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी, की जामुनझीरा या आदीवासी पाडयावर शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास विलास भाईसिंग बारेला (वय १३) या बालकास विषारी सर्पाने दंश केला. त्याला यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतू वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सांगोळे यांनी उपचार करून त्याची प्रकृती गंभीर झाल्याने काल सायंकाळी ६ वाजता विलासला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Protected Content