रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्त्याला मंजुरी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-पुनखेडा-पातोंडी रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आणि भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या प्रयत्नांमुळे ४.७८० कि.मी. लांबीच्या या रस्त्यासाठी ४ कोटी ९३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. रावेर-पुनखेडा-पातोंडी हा रस्ता खूप खड्डेमय आणि दुरवस्थेत होता. शेतकरी आणि नागरिकांनी वारंवार नवीन रस्ता करण्याची मागणी केली होती. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतीसाठी येण्या-जाण्यात अडचणी येत होत्या, तसेच गावांतील जनजीवनही प्रभावित झाले होते.

 

मंजुरी मिळाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठी सोय होणार आहे. नव्या रस्त्यामुळे वाहतूक सुलभ होईल, शेतीमालाची वाहतूक वेळेवर होईल, आणि ग्रामस्थांचे जीवनमान सुधारेल. या निर्णयामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि शेतकऱ्यांची मोठी समस्या सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. हा निर्णय शेतकरी आणि नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

Protected Content