आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । म्हसावद गावाजवळ घराकडे येत असलेल्या दुचाकीस्वाराला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रहीम अमीर पटेल (रा. नाचणखेडा, ता . जामनेर) हा गंभीर जखमी झाला. ही घटना ९ ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी रविवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ट्रक चालक श्रीकांत प्रकाश घिसाडी (रा. खर्ची, ता. एरंडोल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा रहीम अमीर पटेल हा तरुण (एमएच १७, बीक्यू ७४५४) क्रमांकाच्या दुचाकीने ९ ऑक्टोंबर रोजी दुचाकीने म्हसावद ते एरंडोल रस्त्याने घरी जात होता. म्हसावद गावाजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ४८, ऐजी ५५३५) क्रमांकाच्या आयशरने त्याला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात रहिम पटेल हा तरूणाच्या डोक्याला, तोंडाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, जखमीचा भाऊ अलीम अमीर पटेल याने दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ट्रक चालक श्रीकांत प्रकाश घिसाडी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहेत.

Protected Content