साताऱ्यात अजित पवारांना धक्का; दोन मोठे नेते शरद पवारांच्या पक्षात

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे शरद पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

त्यांच्यासोबत फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. यामुळे अजित पवार यांच्यासह महायुतीला हा मोठा धक्का मानला जातो. पक्षप्रवेश व जाहीर सभा आज १४ ऑक्टोबर रोजी फलटण येथील अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे होणार आहे.

Protected Content