आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेमंड चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मआयडीसी पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विकास सरिचंद पवार वय ४४ रा. भवानी चौक, सुप्रिम कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विकास पवार हे आपल्या पत्नी चंद्रकला पवार यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीडी ३८७२) ने तात असतांना एमआयडीसीतील रेमंड चौफुलीवर समोरून येणारी आयशर ट्रक क्रमांत (एमएच २० जीसी ८३१२ ) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात विकास पाटील व त्यांची पत्नी चंद्रकला पवार हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विकास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर ट्रकचालक अमोल कोळी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पंकज पाटील हे करीत आहे.

Protected Content