आडगावात पाच कन्याकुमारी यांच्याहस्ते शस्त्र पूजन

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तालुक्यातील आडगाव येथे दरवर्षीप्रमाणे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आडगावातील कन्याकुमारी व ज्येष्ठ नागरिक व बजरंग दलाचे कार्यकर्ते शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून तरवाडे येथील समर्पण गोशाळेचे संचालक हभप संत रोहिदासजी महाराज वसाडेकर, कुंझर येथील संत मीराबाई गोशाळा येथील संचालक विकास राजपूत व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी गावातील कन्याकुमारींच्या हातून शस्त्रपूजन करण्यात आले. श्रद्धा निष्ठा अशी भावना असेल तर त्या कार्यक्रमांमध्ये व कार्याला विजय मिळत असतो त्याला म्हणतात विजयादशमी असे प्रतिपादन रविदासजी महाराज वरसाडेकर यांनी केले. विजयादशमी निमित्त शस्त्रपूजनाच्या कार्यक्रम बजरंग दलाचे हे हेमंत सुरेश शेलार व गावातील बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

Protected Content