बॉलिवुडमध्ये फक्त प्रसिद्ध व दिग्गजांना मान – कोकणा सेन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वत्र भेदभाव केला जातो. सेटवर फक्त प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींना मान मिळतो. इतरांना एखाद्या फर्निचरसारखी वागणूक दिली जाते. त्याना धक्के देखील दिले जातात. अशा वातावरणात काम करणे खूप कठीण असते, असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने केला आहे. यासोबतच इंडस्ट्रीमधील लोक माणसाची जात आणि वर्ग ठरवतात, त्यांना कुठे बसायचे आणि कोणते पदार्थ खायला दिले पाहिजेत हे देखील ठरवले जाते, असा दावाही कोंकणाने केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक चमकदार गोष्टी सर्वांना आकर्षित करत असतात. पण झगमगत्या चंदेरी दुनियेतील काही धक्कादायक आणि कटू सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावतात. अनेक अभिनेत्री बॉलिवूडबद्दल अनेक चांगल्या- वाईट गोष्टीबद्दल नेहमी सांगत असतात. मात्र आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने बॉलिवूडमधील मोठे सत्य उघड केले आहे. बॉलिवूडमध्ये देखील धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव होतो असा कोणी विचार देखील केला नसेल. मात्र बॉलिवूडमध्ये देखील जात आणि वर्गाच्या आधारावर भेदभाव केला जातो, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

Protected Content