विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत हर्षल चौधरीचे यश

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे झालेल्या शालेय धनुर्विद्या स्पर्धेत सावदा येथील ए.जी.हायस्कूल व एन.जी.पाटील ज्युनीअर कॉलेजातील बारावीत शिकणारा विद्यार्थी हर्षल चौधरी याची विभागीय स्तरावर प्रथम आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा व युवा सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्यामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सावदा येथील ए.जी.हायस्कूल व एन.जी.पाटील ज्युनीअर कॉलेजातील बारावीत शिकणारा विद्यार्थी हर्षल चौधरी याची विभागीय स्तरावर प्रथम आला आहे. यानिमित्ताने शाळेमध्ये प्राचार्य पी.जी. भालेराव, पर्यवेक्षक वाय. एन. पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी त्याचे भरभरून कौतुक केलेले आहे. सदर विद्यार्थ्यांचे मुख्याधिकारी श्री भूषण वर्मा साहेब यांनी त्याचे कौतुक केलेले आहे.

Protected Content