वाघूर बॅकवॉटर येथे जल महोत्सवचे माजी नगराध्यक्ष साधना महाजनांच्या हस्ते उद्घाटन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील गारखेडाजवळ असलेल्या वाघूर बॅक वॉटर मध्ये ८ ते १० सप्टेंबर या तीन दिवसीय एक्वाफेस्ट जल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, अरविंद देशमुख,पंकज बिरलाजी, संध्या पाटील, अशोक पाटील, वंदना पाटील आदी उपस्थित होते. जल महोत्सव पहिल्यांदाच वाघूर बॅक वॉटर येथे जल महोत्सव संपन्न होत आहे. जल महोत्सवमध्ये विविध रेस बोट आणण्यात आले असून नाम मात्र फी आकारण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content