उद्या हरियाणा-जम्मू व काश्मीर विधानसभा निवडणूकीचा निकाल

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झाले. यानंतर आता या दोन्ही निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहे.

या निकालासाठी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.

हरियाणातील मतदारांचा सहभाग जवळपास ६७.९० टक्के इतका होता. दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी हरियाणात एकाच टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Protected Content