पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का; दिग्गज नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवारांच्या पक्षात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या प्रवेशासाठी रांग लागली असून पश्चिम महाराष्ट्रात एक दिग्गज नेता संपर्कात असल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार आहे अशी सूत्रे आहे. दीड वर्षांपूर्वी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर निंबाळकर हे त्यांच्यासोबत होते.

रामराजे यांना फलटणमधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांनी तिथून दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केल्याने ते नाराज आहेत. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात रामराजे यांनी उघड भूमिका घेतली होती. सध्या साताऱ्याचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांच्याशीही त्यांचं फारसे सख्य नाही. त्यामुळे त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेणार असे समजले जात आहे.

Protected Content