जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जिल्ह्यातील ३२ केंद्रांसह गोदावरी अभियात्रिकी महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन झाले. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजना अंतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन वर्धा येथील कार्यक्रमात करण्यात आले. त्यात गोदावरी अभियात्रिकीत महाविद्यालयाचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.व्ही एच पाटील, प्रा. शफीक उर रहेमान आदी उपस्थित होते. माजी खा. डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकीताई पाटील यांचा यासाठी पाठपुरावा सुरु होता. सदर महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. माहिती तंत्रज्ञान, आधुनिक प्रशिक्षण पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रातील अद्ययावत शिक्षण मिळणार आहे. या केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी वाढतील तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. व्ही एच पाटील यांनी यावेळी दिली. सर्व संचालक, सर्व प्राचार्य यांनी सदर केंद्र सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.