चंद्रयान-४ चंद्रावरून मातीचे नमुने घेऊन येणार; इस्त्रोची माहिती

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या वर्षी चंद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचला होता. यानंतर तो चंद्रावर १४ दिवस सक्रिय राहिला आणि त्याने पाठवलेल्या माहितीच्या आधारे अनेक तपासण्या करण्यात आल्या, ज्या अजूनही अधूनमधून समोर येत असतात. आता सर्वांच्या नजरा चांद्रयान-४ मोहिमेकडे लागल्या आहेत. २०२९ मध्ये लाँच होणार असून त्याची अपेक्षित किंमत २१०४ कोटी रुपये आहे. चंद्रयान-४ चंद्रावरून दोन ते तीन किलो मातीचे नमुने घेऊन येणार असल्याची खुशखबर इस्रोने नुकतीच दिली होती.

चंद्रयान-४ मध्ये पाच प्रकारचे मॉड्यूल काम करतील. अ‍ॅसेंडर मॉड्यूल, डिस्प्रेसर मॉड्यूल, री-एंट्री मॉड्यूल, ट्रान्सफर मॉड्यूल आणि प्रोपल्शन मॉड्यूल. ते दोन वेगवेगळ्या एमव्हीएम ३ लाँच व्हेइकलमध्ये लाँच केले जातील. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रोने म्हटले आहे की, चंद्रावर उतरल्यानंतर रोबोटिक आर्म, ज्याला सरफेस सॅम्पलिंग रोबोट देखील म्हटले जाते, लँडिंग साइटच्या आजूबाजूची दोन ते तीन किलो माती काढून घेईल आणि नंतर एएमवर बसवलेल्या कंटेनरमध्ये भरेल.

पृथ्वीच्या कक्षेत प्रवास करताना गळती रोखण्यासाठी नमुने असलेले कंटेनर सील केले जातील. माती संकलनाच्या विविध टप्प्यांवर व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे, असे इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे. याआधी माध्यमांशी बोलताना इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले होते की, चांद्रयान-३ ने दाखवून दिले आहे की चंद्रावर कोणत्याही ठिकाणी उतरणे आपल्याला शक्य आहे आणि त्यानंतर वैज्ञानिक प्रयोग खूप चांगले झाले आहेत.

Protected Content