भुसावळ (प्रतिनिधी) संस्कृती फाउंडेशनच्या मदतीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत मिळाली. मतदान जनजागृतीमध्ये त्यांचे कार्य महत्वाचे असून शहरवासीयांनी त्यांचा आदर्श घ्यावा,असे प्रतिपादन रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी नुकतेच केले आहे. ते संस्कृती फाउंडेशनच्या सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
लोकसभा निवडणूक २३ एप्रिलला पार पाडली या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाकडून संस्कृती फाउंडेशनच्या युवकांच्या सेवाभावी संस्थेला अंध, अपंग तसेच शारीरिक विकलांग मतदारांना मतदान केंद्रावर आणून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत अशी जबाबदारी संस्थेला देण्यात आली होती. या जबाबदारीचा स्वीकार करीत संस्कृती फाउंडेशनने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबवून यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजवावा या हेतूने तसेच जास्तीत जास्त मतदान व्हावे,या अनुषंगाने शारीरिक दृष्टीने अपंग असणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करुण घेण्याची महत्वाची भूमिका युवकांनी पार पाडली.
प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार सतीश निकम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्था अध्यक्ष रणजितसिंग राजपूत ह्यांचा नेतृत्वाखाली संस्थेचे सुमारे ४० स्वयंसेवक प्रत्येक मतदान केंद्रावर विकलांग मदतनीस म्हणून कार्य केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भुसावळ तालुक्याचे मतदान ५२% झाले. त्यात संस्कृती फाउंडेशन च्या मदतीने सर्वाधिक जास्त दिव्यांग मतदान प्रमाण ६९% भुसावळ तालुक्यात झाले. यामुळे संस्कृतीच्या ज्या सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत मदतनीस म्हणून कार्य केले,अशा सर्व सदस्यांचा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर व नायब तहसीलदार निवडणूक विभाग सतीश निकम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यांचा झाला सन्मान
रणजितसिंग राजपूत, तुषार गोसावी, अशफाक तडवी सीमा आढळकर, पराग चौधरी, पवन कोळी, तेजस गांधेले, अजित गायकवाड, यामिनी महाजन गीतिका कोरी, राहुल चौधरी, पल्लवी डांबरे, संस्कार मालविया, नम्रता चांडक, यश चांडक, लोकेशवरी कापडी, कोमल बोरणारे, माधुरी विसपुते, काजल तायडे, प्रियंका पाराशर, हर्षल येवले, जोस्तना झारखंडे, मंगेश भावे, सौरभ रणदिवे.