अजित पवारांनी दिली गुड न्युज ! लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे मिळतील ३ हजार

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या महिन्याच्या हफ्त्याची रक्कम जमा होत आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील परळी येथे होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ही योजना पुढील पाच वर्षे अशीचचालू राहील. तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणा ही अजित पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा काढली आहे. सध्या त्यांचा दौरा मराठवाड्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहि‍णींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहि‍णींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल २ कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. योजनेचे पहिले दोन हफ्ते राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्त महिलांच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी योजनेचा तिसरा हफ्ता बँकेत जमा झाला. तसेक काही महिलांना तीन महिन्यांचे साडे चार हजार एकदम मिळाले. आता, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता दिवाळीच्या आधी म्हणजेच १० ऑक्टोबरपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Protected Content