धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करू नये- अ.भा. आदिवासी विकास परिषदेची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश न करण्याची मागणीचे निवेदन अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीने यावल तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे. तसेच प्रलंबीत आदिवासी पेसा क्षेत्रातील नोकर भरती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा यावल चे अजहर तडवी, काँग्रेस अनुसूचित जमाती तालुका अध्यक्ष बशीर परमान तडवी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. या त्यांनी म्हटले आहे की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार मूळ आदिवासींची १२ हजार ५०० पदे जे सध्या रिक्त आहे ती पद भरती तातडीने करावी सह विविध मागण्या त्यांनी निवेदनातुन केल्या आहे. सदर निवेदन संगयोचे नायब तहसीलदार मनोज खारे यांच्याकडे देण्यात आले यावेळी निवासी नायब तहसीलदार गांगुर्डे संगोयोचे सकावत तडवी, अखिल आदीवासी विकास परिषद संघटनेचे शरीफ तडवी, बशीर तडवी , जवानसिंग पावरा, शरीफ तडवी, सुभाष बारेला, बिसा तडवी, लुकमान तडवी यांच्यासह कोरपावली सरपंच विलास अडकमोल व आदिवासी समाज बांधव आदींची उपस्थिती होती.

Protected Content