विविध मागण्यांसाठी आसेमंचे रास्ता रोको आंदोलन

फैजपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपुर येथे आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे वतीने महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जळगांव जिल्हा आसेमं आदिवासी सेवा मंडळ चे जळगांव जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखाँ तडवी व भीम आर्मी एकता मिश़न नेते आसेमं यावल तालुका प्रमुख मोहसीन तडवी यांच्या संयुक्त उपस्थितीत फैजपुर-भुसावळ, फैजपुर-यावल, फैजपुर-रावेर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नंतर फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बबनराव काकडे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात पेसा नौकर भरती तात्काळ करण्यात यावी तसेच आदिवासी एसटी प्रवर्गात धनगर समाजास समाविष्ट करण्यात येवू नये अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी आसेमं चे जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखाँ तडवी उपाध्यक्ष वसीम तडवी मुनाफ यासिन भीम आर्मीचे मोहसीन तडवी संजय तडवी, रशीद तडवी,हसन तडवी,सोहेब मनोज लालखा,मेहरबान तडवी, समीर तडवी,जावेद तडवी, हसीना तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर बंदोबस्त कामी फैजपुर उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली फैजपुर पोलिस स्टेशनचे रामेश्वर मोताळे निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे पीएसआय मैनुद्दीन सैय्यद, पीएसआय वकील पो कॉ रवी मोरे,रशिद तडवी, अमोल वाघ,सलीम तडवी, गोपनीय शाखेचे राहुल चौधरी, पो कॉ भोई, पो. कॉ. चौधरी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

Protected Content