शासनाची भागपुर उपसा सिंचन योजनेस मान्यता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे भागपूर धरणापासून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंत उपसा सिंचन योजनेतून जामनेर, जळगांव व पाचोरा तालुक्यातील 16 हजार 860 हेक्टर क्षेत्र त्याचप्रमाणे जळगांव तालुक्यातील १३ हजार ९०४ हेक्टर क्षेत्र असे ३० हजार ७६४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

वाघूर उपसा सिंचन योजना ही दोन टप्प्यात असून यांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील एकूण १९१३२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. यासाठी ३८१० शेततळे करण्यात आले असून या शेततळ्यांमध्ये वाघूरचे पाणी हे बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून पोहचवण्यात आले आहे. तब्बल ४६ गावांमधील हजारो शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही राज्यातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण योजना असून यामुळे तालुक्याचा अक्षरश: कायापालट होणार आहे.

भागपुर उपसा सिंचन योजना ता. जि. जळगांव या योजनेंतर्गत भाग-१ व भाग-२ चा समावेश आहे. भाग-१ मध्ये दोन टप्प्यात शेळगांव बॅरेजच्या पश्च फुगवट्यातुन तापी नदीचे पूराचे पाणी कडगांव येथील वाघूर नदीतून उचलुन (लिफ्टद्वारे) १९२.०७ दलघमी पाणी, १२० दिवसात उपसा करुन प्रस्तावित भागपूर जलाशयात पाणी टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सदर भाग-१ चा पाणीवापर हा सिंचनासाठी ९१.२८ दलघमी असुन त्याव्दारे जळगांव तालुक्याचे २६ गांवाचे एकूण १३९०४ हे. सिंचन क्षेत्र भिजविणे प्रस्तावित आहे.

भाग-२ मध्ये भागपूर जलाशयातून पाणी टप्पा क्र. १ ते ३ अनुक्रमे पंपगृह क्र.३, ४ व ५ द्वारे ९८.३५ दलघमी पाणी उचलून वितरणकुंडात टाकणे व तेथून गुरुत्वनलिकेद्वारे विविध ५ मध्यम व ४४ लघु (५ मध्यम प्रकल्प मध्यम प्रकल्प- १. कमानी, २. अग्णावती, ३. तोंडापुर, ४.हिवरा, ५. बहुळा व ४४ लघु प्रकल्प- १. गोगडीनाला, २. देव्हारी, ३. सुर, ४. शिरसोली नेहेरे, ५. दिघी-२, ६. उमरदे, ७. वाणेगाव राजुरी, ८. गाळण -२, ९. घोडसगाव, १०. दिघी -३, ११. शहापुर, १२. वाकडी, १३. शेंदुर्णी, १४. धानवड, १५. गालन, १६. बडारखा, १७. गारखेडा, १८. सर्वे काजोळा, १९. म्हसळा, २०. बांबरुड, २१. वाकडी, २२. लोहारा, २३. गहुळा, २४. पिंपळगाव हरे, २५. कोल्हे, २६. सातगाव, २७. सर्वेपिंप्री, २८. कलमसरा, २९. गोंदेगाव, ३०. चिलगाव, ३१. पिंपळगाव वकोद, ३२. बिलवाडी, ३३. शेवगा, ३४. मोहाडी, ३५. मोयखेडा दिगर, ३६. भगदरा, ३७. महुखेडा, ३८. लहसर, ३९. पिंप्री, ४०. गोद्रि, ४१. हिवरखेडा, ४२. कांग, ४३. अटलगव्हाण, ४४. पिंप्री डांभुर्णी) प्रकल्पांच्या जलाशयात पाणी टाकण्याचे प्रस्तावित आहे. या ध्ये जळगांव तालुक्यातील २ लघु प्रकल्प चे सिंचन क्षेत्र ३२० हे., जामनेर तालुक्यातील २ मध्यम व २० लघु प्रकल्प, कांग व एकुलती सा.त.चे क्षेत्र सिंचन ८६८३ हे. व पाचोरा तालुक्यातील ३ मध्यम व २२ लघु प्रकल्प, गोलटेकडी ल.पा. चे क्षेत्र सिंचन ७८५७ हे. असे भाग-२ पासून १६८६० हे. सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. एकूण भागपुर उपसा सिंचन योजनेचे भाग-१ व भाग-२ द्वारे ३०,७६४ हे. सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. सदर भागपुर उपसा सिंचन योजनेच्या भाग-२ ला ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने मा. मुख्यमंत्री यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे भागपुर उपसा सिंचन योजनेच्या रु.२२६२.१२ कोटी किंमतीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास शासनाची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Protected Content