Accident : भरधाव दुचाकी ॲटोरिक्षावर आदळल्याने तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशिनाथ लॉजजवळील एचडीएफसी बँकेसमोर पुढे चालणाऱ्याला ऑटोरिक्षाला भरधाव दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय मगन पाटील वय ३९ रा. अयोध्या नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, विजय मगन पाटील हा तरूण आपल्या आई, भाऊ व बहिणीसोबत वास्तव्याला होता. काशीनाथ लॉज जवळील ढोर बाजार परिसरात पानटपरी चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दुचाकीने जात असतांना काशीनाथ लॉजजवळील एचडीएफसी बँकेसमोर पुढे चालणाऱ्या ऑटोरिक्षावर आदळली. या अपघातात विजय पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात वडील, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content