राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी प्रदीप पाटील तर शहरउपाध्यक्षपदी अमरनाथ अवचिते

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील व अमरनाथ अवचिते यांनी आरोग्यनायक डॉ संभाजीराजे आर पाटील यांच्या नेतृत्तवावर विश्वास संपादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पारोळा शहराध्यक्षपदी प्रदिप पाटील तर शहर उपाध्यक्षपदी अमरनाथ अवचिते यांची नियुक्ती करण्यात आली तसेच येत्या काही दिवसांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकी लागू होत आहे, त्यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागा असे सूचना करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नियुक्ती करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ महेश पवार,पारोळा तालुकाध्यक्ष दैवान पाटील, तालुका चिटणीस अरुण पाटील, भटू पाटील, आकाश अवचिते सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content