रावेर शहरातील दत्तात्रय नगरातील रहिवाशांना नागरी सुविधा द्या; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर नगरपालिका हद्दीत नवीन समाविष्ट झालेल्या दत्तात्रनगर परिसरातील कॉलनी भागात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या भागातील नागरीकांनी मुख्याधिकारी समीर शेख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, दत्तात्रयनगर आणि परिसरातील कॉलनी मधील गट क्रमांक ५०९, ५४३ व लागू असलेल्या कॉलनीचा हद्दीत नगरपालिका हद्दीत समावेश झाला आहे. रावेर नगरपालिका हद्द वाढ झाल्यापासून आम्ही नियमित कर भरणा करतो. सदर भागात नगरपालिकेकडून स्ट्रीट लाईट वगळता कोणतीही सुख-सुविधा नाही. कॉलनीलील रस्ते करून करावे. नवीन वसाहतीत रहिवाशी राहावयास आले.या भागात गटारी नाही. त्यामुळे सांड पाण्यासाठी प्रत्येकाच्या घरासमोर तीन ते चार शोषखड्डे केलेले असून आता नवीन शोषखड्डे करणेसाठी जागा राहिली नसून सांडपाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून साथीचे आजार पसरत आहेत.तातडीने नगर उत्थान योजने अंतर्गत भुयारी गटारी बांधण्यात याव्यात. पुरवठा योजने अंतर्गत नवीन पिण्याच्या पाण्याची वाढीव पाईप लाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत .

यांच्या आहेत निवेदनावर सह्या
निवेदनाव प्रभाकर पाटील , गजमल पाटील , विश्वनाथ पाटील , मोहन गरुड, राजेंद्र महाजन , सदाशिव महाजन , अनिल पाटील , जीवन महाजन , रविंद्र पाटील , प्रभाकर बोंडे , समाधान पाटील , राजकुमार जैन , एकनाथ पाटील , प्रकाश महाजन , संजय पाटील , विजय चौधरी आदिंच्या सह्या आहेत.

Protected Content