Home Cities यावल सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये आ. शिरीष चौधरींच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुणगौरव

सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये आ. शिरीष चौधरींच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुणगौरव

0
61


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल शहरातील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक २६ सप्टेंबर गुरुवार रोजी शाळेत मधुस्नेह संस्था परिवारातर्फे शिक्षक दिनानिमित्त यशवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्कुलच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमदार शिरिष चौधरी, माजी यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, यावल शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष कदीर खान, जिल्हा परिषदचे माजी विरोधी पक्ष गटनेते प्रभाकर सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच अध्यक्षांच्या वतीने शाळेतील इयत्ता १० वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा सुद्धा अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांनी हा सोहळा आयोजित करून तालुक्यातील, प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शैक्षणिक विषयावर योग्य असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन व संस्थेचे संचालक शशीकांत फेगडे व शिक्षक गोपाळ महाजन व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास प्रशांत फेगडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


Protected Content

Play sound