वड्री ग्रामपंचायत व वन व्यवस्थापन समितीकडून आदिवासी बांधवांना भांडे वितरीत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील वन विभागाच्या संयुक्त व्यवस्थापक समिती वड्री वनविभाग च्या माध्यमातुन वड्री या आदिवासी गावात विविध सामाजिक उपक्रमच्या माध्यमातुन समाज उपयोगी भांडे घेण्यात आले.

वनविभागाचे जळगावच्या यावल वनविभाग उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व यावलच्या पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे, वनपाल रवी तायडे, वड्री गावातील वनसमितीचे अध्यक्ष तथा वड्री गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय भालेराव,वन समितीचे उपाध्यक्ष बशीर परमान तडवी, सचिव वनपात रवि तायडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंकज चौधरी,माजी पोलीस पाटील गोविंदा सुरवाडे, ग्रामपंचायतचे शिपाई राजू भालेराव, रवींद्र बागुल.सरदार गुलजार तडवी, हमीद इदबार तडवी यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत व सर्व वन समितीचे सदस्य यांच्या उपस्थित सदर वन व्यवस्थापन समितीच्या जमा असलेल्या रक्कमेतुन समाज उपयोगी भांडे वितरीत करण्यात आली .

Protected Content