भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल, शारदा नगर, भुसावळ येथे २१ सप्टेंबर शनिवार रोजी स्व. बाबासाहेबांची 44व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद एन. नारखेडे प्रमुख पाहुणे जळगाव येथिल वकिल सागर चित्रे, सेक्रेटरी पी व्ही पाटील, ऑनररी जॉईट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे,संस्थेचे सभासद विकास पाचपांडे,भाग्येश नारखेडे, अर्चना नारखेडे, रवी पाटील, एस पी महाजन, शाळेच्या उपमुख्याध्यापिका अर्चना कोल्हे,पर्यवेक्षिका राखी बढे, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आदरणीय बाबासाहेब के नारखेडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.याप्रसंगी सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका गजाला बासीत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वकिल सागर चित्रे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन विदयार्थ्याना शारीरीक तसेच मानसिक आरोग्याचे महत्व सांगितले. तसेच कोणत्याही स्पर्धेत विदयार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असतो, हारजीत महत्वाची नसते.
मान्यवरांच्या शुभहस्ते स्व. बाबासाहेबाच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सलाड स्पर्धा,ग्रीटींग काडऀ बनविणे आणि विज्ञान प्रदर्शन या सर्व स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. भुसावळ शहरातील सहभागी झालेल्या ताप्ती पब्लीक स्कुल, वर्ल्ड स्कुल, के नारखेडे विदयालय या शाळेतील विदयार्थ्यांनी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविल्याबददल त्यांना बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन गजाला बासीत,शबनम तडवी आणि धनश्री महाजन यांनी आभार मानले. सदरील कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.