Home Cities जळगाव काँग्रेस पक्षाच्या जळगाव शहर उपाध्यक्षपदी योगिता शुक्ल

काँग्रेस पक्षाच्या जळगाव शहर उपाध्यक्षपदी योगिता शुक्ल

0
114

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा तथा कांग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ता योगिता शुक्ल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस कमेटीच्या नेत्या माजी खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे काम सातत्याने व प्रामाणिक पणे करत आहेत पक्षाचे विचार ध्येय व धोरणे तळागळातील जनते पर्यंत पोहचविण्याचे कार्य जिद्दीने व निष्ठेने करीत असुन पक्षाच्या विचाराने सर्व सामान्यांसाठी तसेच समाजातील असंघटीत महिला कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्याच्या दुष्टीने निस्वार्थ कार्य करीत आहे त्यांच्या या कार्यांची पक्षाने दखल घेतली व जळगाव शहर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष शामकांत तायडे यांनी नियुक्ती केली आहे.

जळगाव येथील कांग्रेस भवनात झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात योगिताताई शुक्ल यांना नियुक्ती पत्र देण्यात आले त्यांच्या नियुक्तीचे शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे,प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे,डॉ.अर्जुन भंगाळे जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हा सरचिटणीस श्रीधर चौधरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, माजी शहर जिल्हाध्यक्ष सलीम पटेल, ॲड.अविनाश भालेराव,विनोद कोळपकर रजनीताई पाटील, डॉ. अनिल शिंदे,सुभाष पाटील दिपक सोनवणे ,राहुल भालेराव, गोकुल चव्हाण, प्रा.विशाल पवार, गणेश राठोड जाकीर बागवान, सुधीर पाटील, सकीना तडवी,छाया कोरडे अमिना तडवी सुमन मराठे, रत्ना बागुल यांच्यासह कांग्रेस पक्षाने पदाधिकारी व कार्यकर्तेनी अभिनंदन केले आहे


Protected Content

Play sound