अहमदनगरमध्ये शरद पवारांना धक्का; मोठा कार्यकर्ता भाजपमध्ये

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडच्या काळात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. केवळ मोठे नेतेच पक्ष बदलत नाहीत तर कार्यकर्तेही आपल्या मूळ पक्षापासून फारकत घेऊन इतर पक्षांमध्ये सामील होत आहेत. आता अहमदनगरमध्ये शरद पवार गटाला जोरदार धक्का बसणार आहे. येथे आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील शरद पवार गटातील काही वरिष्ठ पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कर्जत जामखेडे विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना भाजप दणका देणार आहे. कर्जत जामखेडे येथील तालुकाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Protected Content