बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा‘ उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांची महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेने दि. २१ व २२ सप्टेंबर असे दोन दिवस आयोजित केलेल्या या महोत्सवात ७८० बालकलावंतांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.

आज (दि.२२) दुसऱ्या दिवशी समूह लोकगीत व समूह लोकनृत्याच्या सादरीकरणात एकूण २७ शाळांचा सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे अनिल जोशी, मृदंग ॲड्‌सचे सीईओ अनंत भोळे, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष (प्रशासन) हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष (उपक्रम) अमोल ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी दोन दिवसात झालेल्या महोत्सवाचा आढावा मांडला. या महोत्सवात दोन दिवसात ७८० बालकलावंतांनी लोककलांचे सादरीकरण केले. तसेच या महोत्सवाला शहरातील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन तसेच मृदंग ॲड्‌स यांचे लाभलेल्या अनमोल सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रध्दा पाटील यांनी केले.

‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत गायन, एकल लोकगीत गायन, एकल लोकनृत्य व एकल लोकवाद्यवादन अशा पाच कला प्रकारातील लोककला सादरीकरण करण्यात आले. यात समूह लोकनृत्यात सर्वोत्कृष्ठ पारितोषिक रु. ११ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अनुभूती स्कूल जळगाव, उत्कृष्ठ – रु. ७ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र स्वामी समर्थ विद्यालय आव्हाणे, उत्तम – रु.५ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव, प्रशंसनीय १ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र ओरियन स्कूल जळगाव, प्रशंसनीय २ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र बालविश्व विद्यालय तर परिक्षक प्रोत्साहन पुरस्कार आदर्श विद्यालय यावल यांनी पटकावले. समूह लोकगीतगायनात सर्वोत्कृष्ठ पारितोषिक रु. ११ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्कृष्ठ – रु. ७ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्तम – रु.५ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प.न.लुंकड कन्या शाळा जळगाव, प्रशंसनीय १ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र कै.श्रीमती ब.गो. शानबाग विद्यालय जळगाव, प्रशंसनीय २ – रु.२ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र विवेकानंद विद्यामंदिर भुसावळ यांनी पटकावले.

एकल सादरीकरणात लोकनृत्य प्रकारात सर्वोत्कृष्ठ – रु.३ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.तनुश्री दांडगे, उत्कृष्ठ – रु.२ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र श्लोक गवळी, उत्तम – रु.१ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.दिक्षा नाथबुवा, प्रशंसनीय १ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.नायरा तडवी, प्रशंसनीय २ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.हर्षिता निकुंभ यांनी पटकावले. लोकवाद्यवादन प्रकारात सर्वोत्कृष्ठ – रु.३ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यज्ञेश जेऊरकर, उत्कृष्ठ – रु.२ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तन्मय पाटील, उत्तम – रु.१ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र इशान भालेराव, प्रशंसनीय १ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.संहिता जोशी, प्रशंसनीय २ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र लकी महाजन, परीक्षकांतर्फे प्रोत्साहनपर कुश सोनवणे यांनी पटकावले. एकल लोकगीत गायन सर्वोत्कृष्ठ – रु.३ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.शर्वा जोशी, उत्कृष्ठ – रु.२ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.भूमिका चौधरी, उत्तम – रु.१ हजार, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र कु.कुंजल दलाल, प्रशंसनीय १ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र गार्गी सननसे, प्रशंसनीय २ – रु.५००, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र सिध्देश गोड, परीक्षकांतर्फे प्रोत्साहनपर कु.माही अत्तरदे यांनी पटकावले.

Protected Content