बालमोहन विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरविले योगाचे धडे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | योग मुळात एक अध्यात्मिक शिस्त आहे जी अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे. जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते. हे एक शास्त्र आहे आणि निरोगी जीवन जगण्याची कला आहे, असे प्रतिपादन डॉ. वनश्री पालवे यांनी केले.

मु. जे. महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ नॅचरोपॅथी यांच्या वतीने योगशिक्षिका डॉ. वनश्री पंकज पालवे यांनी डॉ. देवानंद सोनार व ज्योती वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १९ ते २९ सप्टेंबरदरम्यान बालमोहन विद्यालय, पिंप्राळा येथे विनामूल्य योग वर्ग मुलांकरिता आयोजित केला होता. योग वर्गाचे उद्घाटन ज्योती वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेला ज्योती वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योगा आणि नॅचरोपॅथीचे महत्व सांगितले.

या प्रसंगी मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण डॉ. वनश्री पालवे यांनी केले. एकूण ३१० मुला-मुलींनी योग शिबिराचा लाभ घेतला. बालमोहन विद्यालयातील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कानडे आणि माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा चौधरी यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी या वेळेला उपस्थिती होती.

Protected Content