पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी उपोषणासाठी समाजाचे नेते उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी पहूर बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी धनगर समाज जामनेर तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली.
साखळी उपोषणाची सुरुवात येथील राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याचे पूजन करून समाज बांधवांनी राजमाता अहिल्याबाई होळकर, उभी गल्ली, बाजार पट्टा मार्गे बस स्थानकावर येऊन ढोल ताशाच्या निनादात रॅली काढून या ठिकाणी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
साखळी उपोषणाच्या या पहिल्या दिवशी किरण भास्कर पाटील, अमोल अजय पांढरे या धनगर बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली असून उपोषणस्थळी माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, ईश्वर बाबूजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, शिवसेनेचे नेते गणेश पांढरे, धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, समाधान पाटील, ॲड एस आर पाटील, शैलेश पाटील ज्ञानेश्वर करवंदे, अरुण घोलप, किरण पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शाम सावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख, अरविंद देशमुख, संजय तायडे, विनोद पाटील, सुनील पाटील, अमोल पाटील, अशोक पंढरी पाटील, बंडू पाटील, विनोद पाटील, शांताराम गोंधणखेडे, भाऊराव गोंधनखेडे, सुकलाल बारी, अशोक देशमुख, शरद पांढरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.