यावल तालुक्यात लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकांकडून दिशाभूल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यासह विविध बँकेकडून मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अमलबजावणी करणारे बॅंकेतील अधिकारी वर्गाकडून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत या योजनेच्या लाभार्थी दिशाभुल केल्याची प्रकार समोर आला असून याबाबत तक्रारींची दखल घेत लाडकी बहिणींची अडचणी सोडवाव्यात अशी मागणी केली जात आहे.

राज्य शासनाने महिलांसाठी आर्थिक सुरक्षा आणी स्वातंत्र्य वाढवणे या उद्दिष्ठाने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही प्रभावशाली योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेची यावल तालुक्यातील बँक अधिकारी यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे लाडक्या बहीणींसाठी डोकेदुखी ठरत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातुन लाडकी बहीण या योजनेचे दोन महीन्यांचे ३००० हजार रूपये तात्काळ महीलांच्या बँक खात्यात टाकण्यात आले. परंतू यावल तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँक व सेन्ट्रल बँक या बँकेंच्या शाखांमध्ये प्राप्त झालेले पैसे मिळवण्यासाठी महिला अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे. बॅंक अधिकारी हे राज्य शासनाच्या आदेशाची व नियमांची अमलबजावणी न करता आपआपल्या पद्धतीने बॅंकेचे व्यवहार करीत असल्याने काही महिलांना अद्याप पर्यंत पैसे मिळाले नसुन तर काही महिलांच्या आलेल्या पैशांमधुन बँक थकबाकी किंवा वेगवेगळे कारणे दाखवुन बँकच्या नियमांच्या नांवाखाली शासनाकडून आलेल्या ३ हजार रूपयांमधुन विविध कारणे दाखवुन पैसे कपात केले जात असल्याने महिलांमध्ये संत्पत प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे.
.
बॅंकेच्या अशा व्यवहारांमुळे महीलांना योग्य रित्या त्यांच्या हक्का आलेले पैसे महिलांना देण्यास टाळाटाळ मागील ३ हजार रुपये आले असता बँक मधून मागील काही लोन बाकी होते त्या लोन मध्ये लाडली बहीण योजनेचे आलेले ३ हजार रुपये हे लोन खात्यात वर्ग करून घेतले व महिला लाभार्थी पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना उडवा उडीवाचे उत्तर दिले जात असल्याने मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण चांगली संत्पत झालेल्या दिसुन येत आहे .

Protected Content