Home Cities अमळनेर कोर्टातील केस मागे घेण्याचे सांगून महिलेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

कोर्टातील केस मागे घेण्याचे सांगून महिलेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

0
52

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर न्यायालयाच्या आवारात महिलेचा विनयभंग करत कोर्टातील केस मागे घेण्याचे सांगून अश्लिल शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना बुधवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेसहा वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील केले नगरात ५५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. महिलेने योगेश मोहन पवार रा. अमळनेर आणि भरत माधव मोरे रा. कोळपिंप्री ता,पारोळा यांच्या विरोधात अमळनेर केस दाखल केली आहे. बुधवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता अमळनेरातील कामकाज झाल्याने महिला ही दुचाकीजवळ आली असता त्यांच्याजवळ योगेश पवार आणि भरत मोरे हे दोघेजण आले. त्यांनी महिलेला धमकी देत कोर्टातील केस मागे घे असे सांगत महिलेचा हात पकडून विनयभंग केला. तसेच अश्लिल शिवीगाळ करत धमकी दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी साडेसहा वाजता संशयित आरोपी योगेश मोहन पवार रा. अमळनेर आणि भरत माधव मोरे रा. कोळपिंप्री ता,पारोळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound