यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष या पक्षाच्या महायुतीचे राकेश वसंत फेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक एफ. एस. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभापती निवडीच्या बैठकीत कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान निवड झाल्यावर नुतन सभापती राकेश फेगडे यांनी भालोद येथे जावुन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
यावेळी राकेश फेगडे यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना आदरांजली वाहिली यावेळी अमोल जावळे यांनी राकेश फेगडे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत सत्कार केले. यावेळी पक्षाचे युवा मोर्चाचे वेकंटेश बारी भाजपा भालोद शाखा अध्यक्ष मिनल चौधरी यांच्यासह भाजपाचे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेण्याची परंपरा राकेश फेगडे हे देखील कायम राखतील असा आत्मविश्वास अमोल हरिभाऊ जावळे यांनी व्यक्त केले .