केशवस्मृती व विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गणेश विसर्जन मार्ग स्वच्छता अभियान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केशवस्मृती प्रतिष्ठान व विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७:३० वा.श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचे स्वच्छता अभियान शिवतीर्थ मैदान ते सुभाष चौक येथे पार पडले मा.पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत या स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली,यंदा या उपक्रमाचे ९ वे वर्ष होते.

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि विवेकानंद प्रतिष्ठानच्या पुढाकारातून स्वच्छता अभियानाची रचनात्मक लोकचळवळ आता जनमानसात रुजत आहे.हे अभियान विवेकानंद प्रतिष्ठान च्या ब.गो.शानभाग विद्यालय, काशिनाथ पलोड स्कूल, इंग्लिश मिडीयम विभाग, डॉ. आचार्य विद्यालय,प्राथमिक आणि माध्यमिक विभाग,वरीष्ठ महाविद्यालय इ विभागांतील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, विभाग प्रमुख यांनी यशस्वी केले. या अभियानाचा समारोप सकाळी ९:०० वा. शिवतीर्थ मैदानावर झाला.ब.गो.शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित पथनाट्य सादर केले.

याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. आयुष प्रसाद , केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे अध्यक्ष डॉ.भरतदादा अमळकर,जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. सतिश मदाने,विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव डॉ.रत्नाकर गोरे, सह सचिव विनोद पाटील, सह कोषाध्यक्ष सौ.हेमाताई अमळकर, व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ.वैजयंती पाध्ये यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी, वाहन चालक असे सुमारे १००० कार्यकर्ते या स्वच्छता अभियानात सहभागी झालेत. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोहळे यांनी केले.

Protected Content