सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमरावती जिल्हयातील तिवसा येथे तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल रावेर तालुका कोतवाल संघटनेकडून रावेरचे अप्पर तहसीलदार डॉ. मयुर कळसे यांना निरोप देण्यात आला.
निरोप हा अत्यंत आनंददायी वातावरणात रावेर तालुका कोतवाल संघटना अध्यक्ष सचिन कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रविण धनके, विनोद अटकाळे, महेंद्र चौधरी, गोपाळ बेलदार, विकास माळी, माधुरी महाजन, नयना अवसरमल, शारदा चौधरी व तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.