डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांची माणूसकी; अपघातातील जखमी तरूणाच्या मदतीसाठी धावले !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साळवा फाटा येथे रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी याच रस्त्याने चोपड्याने विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे हे जात असतांना त्यांनी त्यांचे वाहन थांबवून त्यांच्याच वाहनातून जखमी तरूणाला धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान डॉ. कुणाल सोनवणे यांच्या तत्परतमुळे खाकीतील माणुसकी दिसून आल्याचे पहायला मिळाले.

याबाबत अधि‍क असे की, धरणगाव तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील रहिवाशी राकेश गुलाब पाटील वय 35 हा तरूण दुचाकी क्रमांकाने (एमएच १९ सीएन ९८१४) ने गुरूवारी १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास साळवा फाट्यावरून जात असतांना रस्त्यावर उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मागून दुचाकी धडकली. या अपघातात राकेश पाटील यांच्या तोडाला गंभीर दुखापत झाला आहे. त्यावेळी याच रस्त्यावरून चोपड्याचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे शासकीय वाहनाने धरणगावकडून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांनी तात्काळ वाहन थांबविले व जखमीस त्यांच्या वाहनात टाकून धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यांना चालक पोलीस कॉन्स्टेबल तुषार मधुकर साळुंके, आणि आरटीपीसी निलेश पाटील यांनी सहकार्य केले. दरम्यान जखमीवर प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलीस वर्दीतील माणूसकी दिसून आल्याने परिसरातील नागरीकांनी त्यांचे कौतूक करत आभार व्यक्त केले.

Protected Content