जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एका इंडिकाने अचानक पेट घेतल्यामुळे प्रचंड भीतीचे वातारवण पसरले होते.
या संदर्भात अधिक असे की, अमोल चौधरी (वय 45, रा. जिजामाता नगर, वाघनगर परिसर) हे भारतीय सेनेत कार्यरत आहेत. सध्या ते सुट्टीवर घरी आले आहेत. त्यांची इंडिका कार (एमएच 12 सिएच 8609) एक गेल्या एक वर्षापासून बंद होती. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुरुस्तीसाठी एसटी वर्कशॉप जवळील एका गॅरेजवर मेकॅनिककडे घेऊन जात असताना सायलेन्सर अचानक जाम झाल्याने धूर निघाला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोलीस कर्मचारी व कर्मचारी यांनी धाव घेऊन गाडी तत्काळ थांबवली. त्यानंतर महानगरपालिकेच्या बंबाने कारवर पाणी ओतून धूर विझवला.