धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील एका भागात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दखवत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की. भुसावळ तालुक्यातील दीपनगर गावातील एका भागात ३८ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. या महिलेची ओळख हार्दीक हेमचंद्र सोनी रा. दीपनगर, ता.भुसावळ याच्याशी तीन वर्षांपुर्वी ओळख निर्माण झाली, यावेळी हार्दीक सोनी याने महिलेला लग्नाचे आमिष दखवत वेळोवेळी अत्याचार केला, त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने सोबतचे आक्षपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून मारहाण केली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने थेट भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी हार्दीक हेमचंद्र सोनी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.

Protected Content