Home क्राईम गांजाची झाले लावणे पडले महागात; शेतकऱ्याला अटक

गांजाची झाले लावणे पडले महागात; शेतकऱ्याला अटक

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर-पळसोद शिवारात गांजाची झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यावर जळगाव तालुका पोलिसांनी बुधवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत 27 झाडे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री साडेदहा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकाश दशरथ सोनवणे (५८, रा. भोकर, ता. जळगाव) असे अटक केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर पळसोद शिवारात शेतकरी प्रकाश सोनवणे यांनी त्याच्या कपाशीच्या शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती जळगाव तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी शेतात जाऊन पाहणी केली असता शेतात कपाशीच्या पिकात गांजाचे २७ झाडं लावलेली आढळून आली. पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, कृषी अधिकारी अमित भामरे, वजन मापे निरीक्षक अनंत पाटील यांना बोलवून खात्री करीत पंचनामा केला. ही झाडं जप्त करण्यात आली असून १२ किलो वजन व अंदाजे ४० हजार रुपये त्याची किंमत आहे

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बापू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोउनि गणेश सायकर, नयन पाटील, पोहेकॉ दीपक चौधरी, बापू पाटील, किरण अगोणे, चेतन पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील यांनी केली.


Protected Content

Play sound