विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात २१ फुट उंच त्रिशुलाची स्थापना

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी क्रेनच्या साह्याने २१ फुट त्रिशूलची स्थापना करण्यात आली.

रविवारी दुपारी शिरुड नाका, वडचौक, पाचपावली देवी, बसस्टँड, डॉ बहुगुणे, भगवाचौक, मुंदडा नगर, विद्या विहार कॉलनी इ.परिसरातून त्रिशूलची वाद्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी पूजा करण्यात आली.

मिरवणुकीत रवि पाटील, प्रशांत निकम आदित्य बिल्डर, ईश्वर महाजन, कपिल पाटील, संजय पाटील, राहुल शिंपी, अमोल पाटील, कल्पेश साळुंखे, सुनिल शिंगाणे, मोहित पवार, भैय्या साळुंखे, तेले सर, सागर पाटील, किरण अहिरे, विवेक तेले, मिलिंद वारुळे, प्रविण गुजर तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content