जळगावच्या प्रकरणात मला केव्हाही अटक होणार ! : अनिल देशमुख

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ”गिरीश महाजन यांच्यावरील गुन्ह्याशी संबंधीत प्रकरणात सीबीआय आपल्याला केव्हाही अटक करू शकते !” असे वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मविप्रमधील वादात गिरीश महाजन यांच्यावर दाखल गुन्ह्यासाठी कथित दबाव टाकल्याचे प्रकरण अलीकडच्या काळात ऐरणीवर आले आहे. या प्रकरणी शरद पवार व एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव पोलिसांवर दबाव टाकल्याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी आज अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना आपल्याला सीबीआय कोणत्याही क्षणी अटक करू शकते असे विधान केले आहे. ते म्हणाले की, सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नसतांना देखील हा गुन्हा चुकीच्या पध्दतीत दाखल करण्यात आला आहे. तर, सीबीआय आपल्याला अटक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी या प्रकरणी केला.

Protected Content