पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत नवदीप सिंहने मिळवले सुवर्ण

पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत अनेक पदके मिळवली आहे. 8 सप्टेंबर रोजी खेळांचा हा भव्य कार्यक्रम समाप्त होईल. त्याच्या एक दिवस आधी शनिवारी 7 सप्टेंबर रोजी भारताने आणखी एक गोल्ड मेडल जिंकले आहे. याच्यासह भारताकडे आता सात गोल्ड मेडल झाले आहेत. हा कारनामा नवदीप सिंहने मेस जॅवलिन थ्रो एफ41 कॅटेगरीमध्ये केला आहे. या कॅटेगरीत पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. या कॅटेगरीत कमी उंची असणारे खेळाडू भाग घेतात.

नीरज चोप्रा याला पॅरिसमध्ये गोल्ड जिंकता आले नव्हते, मात्र त्याला प्रेरणेचा स्त्रोत मानणारा नवदीपने समाजाकडून टोमणे मिळत असताना गोल्ड मिळवून इतिहास रचला आहे. 4 फूट 4 इंच उंचीच्या हरियाणाच्या नवदीपला हे यश मिळविण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागले.

24 वर्षांचा नवदीप याने तिसऱ्या प्रयत्नात 47.32 मीटरचा थ्रो केला होता. मात्र इराणचा खेळाडू सादेग बेट सहाय याने 47.64 मीटर थ्रो करीत गोल्डवर मोहोर उठवली. या कार्यक्रमानंतर पॅरालिम्पिकच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे नवदीपचा सिल्वर गोल्डमध्ये अपग्रेड झाला. यामुळे नवदीप अत्यंत खूश झाला. लहानपणापासून नवदीपला त्याच्या उंचीवरुन चिडवलं जात होतं. शेजारचेही त्याला चिडवत असतं. त्यामुळे घराबाहेर पडणं त्याला कठीण झालं होतं.

Protected Content