राष्ट्रपुरूषांच्या स्मारकांबाबत महाविकास आघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना शहरातील राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ २ दिवसांपूर्वी गावातील सर्व शिवप्रेमींनी तहसिल कार्यालय आणि पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले. याच पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर २०२४ रोजी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात गावातील राष्ट्रपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री या सर्व महापुरुषांच्या स्मारकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. तसेच छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या कामाच्या ठिकाणी एक फलक लावण्यात यावा ज्यावर स्मारकाचा संपूर्ण तपशील नमूद करण्यात यावा. या अनुषंगाने जर कार्यवाही केली तर गावात मालवण येथे झाला तसा अनुचित प्रकार घडणार नाही आणि एक आदर्श देता येईल.

याप्रसंगी उबाठा सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, अँड शरद माळी, राजेंद्र ठाकरे, उबाठा सेनेचे शहराध्यक्ष भागवत चौधरी, माजी नगरसेवक जितू धनगर, किरण मराठे, युवा सेना शहर प्रमुख परमेश्वर महाजन, संतोष सोनवणे, रामचंद्र माळी, दिनेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, भगवान शिंदे, नईम काझी, नवीद काझी, नारायण चौधरी, खलील (बंटी) खान, गोपाल माळी, राहुल पाटील, प्रफुल पवार, सागर महाले, सागर चव्हाण, रमजान शाह, दुर्गेश चौधरी, भैय्या धनगर, भा.रा.काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष भूषण भागवत, नंदा महाजन, विजय जनकवार आदी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content