पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भगवान श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांची ५ सप्टेंबरला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात व शाळा महाविद्यालयात साजरी करावी असे शासकीय परिपत्रक 18 जानेवारी 2024रोजी निर्गमित केले आहे.
पारोळा तालुक्यातील सर्व कार्यालयात अंमलबजावणी करावी यासाठी पारोळा तालुका महानुभाव परिषद यांच्या वतीने तहसीलदार देवरे पंचायत समिती गट विकास अधिकारी किशोर शिंदे, नगरपरिषदचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे जीव उद्धारक विचार तत्त्वज्ञान मानवतावादी शिकवण सर्व जीव जातीच्या कल्याणासाठी त्यामुळे स्वामींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 5 सप्टेंबरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन अर्थात जयंती साजरी करावी.
शाळा महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालय आदी ठिकाणी साजरी करावी अशी मागणी पारोळा तालुका महानुभाव परिषद व उपदेशी नामधारक वासनिक मंडळी यांच्यावतीने करण्यात आली. प. पू. प. म. श्री. चक्रपाणी बाबा म्हसवे यशपाल दादा मुंदाने तुषार मुनी दादा म्हसवे जनसेवक पी. जी. पाटील, अरुणराव देशमुख, दत्तात्रय पाटील, ए. ए. पाटील, ए. डी. पाटील बारकू, संजय पाटील, किशोर पाटील, भूषण पाटील, विनोद पाटील, कौतिक पाटील, नितीन देसले, अरुण पाटील, जितेंद्र पाटील, कन्हैयालाल पाटील, साहेबराव पाटील इत्यादी उपस्थित होते.