महिलेच्या बंद घरातून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शिक्षक कॉलनीतील महिलेचे बंद घर फोडून घरातून २ लाख २० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटन ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे, याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली मधुकर चौधरी वय ४० रा. शिक्षक कॉलनी, म्हसावद या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान त्याचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घरातून ७० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content