भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जयंतीनिमीत्त क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. या निमीत्ताने विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिन हा ’मेजर ध्यानचंद’ यांची जन्मजयंती क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो भुसावळच्या डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलमध्ये आजा विद्यार्थ्यांनी क्रीडादिनाचे महत्व मनोगतातून व्यक्त केले.शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल आठवण करून देऊन या दिवशी सांघिक कार्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या व्यापक मूल्यांच्या बाबत मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सक्रिय राहण्यासाठी आणि खेळांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्या सहभाग बनवण्यासाठी विविध स्पर्धाच्या माध्यमातून प्रोत्साहित केले.