Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात शरद पवार गटाचे महायुतीच्या सरकारच्या निषेर्धात आंदोलन

मुक्ताईनगरात शरद पवार गटाचे महायुतीच्या सरकारच्या निषेर्धात आंदोलन

0
51


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महायुती सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महिला विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे. मात्र या योजना फोल ठरल्या. महायुती सरकार सहकार क्षेत्र,कर्जमाफी, पिकांचा हमीभाव, पीक विमा, दुध अनुदान, सोयाबीन व कांदा, कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासह, वाढती महागाई, रोजगार, महिला सुरक्षा सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे या सरकारच्या काळात महापुरुषांचा अवमान होतो आहे. या महाराष्ट्र द्रोही सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील या परिस्थितीवर सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीतर्फे मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विरोधी भुमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फ़े प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले तसेच आकाशात काळे फुगे सोडून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी महायुती सरकारच्या कारभारावर कठोर शब्दात टिका करून येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विरोधी भुमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन केले. यावेळी मनोहर खैरनार यांनी राज्य केंद्र सरकारच्या कारभारावर टीकास्त्र डागले.

यावेळी ठाकरे गटाचे मनोहर खैरनार, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, दिलीप पाटिल,विलास धायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटिल, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, लता सावकारे, भागवत पाटिल, प्रेमचंद बढे, अनिल पाटील,प्रविण पाटिल,बापु ससाणे, संजय कोळी, साहेबराव पाटिल,सोनु पाटिल,प्रविण दामोदरे, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे,योगेश काळे,राहुल पाटिल, निलेश भालेराव,भुषण पाटिल, रउफ खान, अज्जू खान, सय्यद फिरोज, जितेंद्र पाटिल, सुभाष खाटीक, रफिक मिस्त्री, हरिभाऊ कवळे, भैय्या पाटिल, बाळा चिंचोले आणि पदाधिकारी उपस्थित होते


Protected Content

Play sound