बांधकामाचे साहित्य लांबविले; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हायवेदर्शन कॉलनीतून ९ हजार रूपये किंमतीचे बांधकामाचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिमचंद भागवत राठोड वय ५० रा. मोहाडी ता.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा इमारत बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे जळगाव शहरातील हायवेदर्शन भागात बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी त्यांनी बांधकामासाठी लागणारे लोखंडी प्लेटा व इतर साहित्य ठेवले होते. दरम्यान २६ ते २८ ऑगस्टच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बांधकामासाठी लागणाऱ्या ९ हजार रूपये किंमतीच्या लोखंडी प्लेटा नेरून नेल्या. ही घटना बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले. याप्रकरणी भिमचंद राठोड यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.

Protected Content