बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी कोळी जमातीच्या नागरिकांना जातीचे दाखले मिळविण्यासाठी केवळ, जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आदिवासी बांधवांनी आंदोलन केले. अशाच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी कोळी बांधवांनी उपविभागीय भुसावळ प्रांत कार्यालयामार्फत जात प्रमाणपत्र मिळाले आहेत. परंतु त्यानंतरही, मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी कोळी बांधवांनी आपल्या उपविभागीय कार्यालयाकडे संबंधित जात प्रमाणपत्र मिळणेसाठी सेतु केंद्रामार्फत अर्ज सादर केले.
अर्जासोबत सबळ पुरावे जोडुन त्या अर्जाची तपासणी झाली असून. अशा सर्वच नविन आणी प्रलंबित असलेल्या अर्जाचा निकाल होऊन, त्या सर्व अर्जदारांना आदिवासी टोकरे कोळी चे जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे यासाठी, नितीन प्रल्हाद कांडेलकर तसेच आदिवासी कोळी समाज बांधवांनी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुक्ताईनगर प्रवर्तन चौकापासून पासुन ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढणार आहोत. आणि जोपर्यंत दाखले मिळत नाही. तोपर्यंत आम्ही आपल्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करणार आहोत. असे त्यांनी म्हटले.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखुन ठेवत. या आंदोलनात मंडप, स्टेज, खुर्च्या, साऊंड सिस्टीम, राहणार आहे. तसेच या आंदोलनात सर्व समाज बांधवांचा सहभाग राहील. दरम्यान आपल्या विभागाने सहकार्य करत, आरोग्य, निवास, आणि भोजन, तसेच शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. आणि याप्रसंगी जरी कोणाचे बरे वाईट झाले, तर संबंधित विभागावर सर्वस्व जबाबदारी राहिले असेही त्यांनी सांगितले.