जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भास्कर मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल शालिमार या परमिट रूम व बारमध्ये मद्यपान करत असलेल्यांमध्ये वाद होऊन एका जणाने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.सुदैवाने यात कोणाला दुखापत झालेली नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
हा गोळीबार भूषण सपकाळे याने हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर मार्केट येथील हॉटेल शालीमार येथे ल दारु पित असताना अचानक टोळक्यातील एकाने जमीनीवर गोळीबार केला. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी घाबरले. टोळक्याने तेथून पळ काढला. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती हॉटेल मालकाला दिली व त्यांनी जिल्हापेठ पोलीसांना कळविले.
पोलिस तपासणीत हॉटेलमधून गोळीबार केलेला रिकामा राऊंड मिळून आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे. गोळीबार करणाऱ्याचे नाव भूषण सपकाळे असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.