चोपडा (प्रतिनिधी) येथील रोटरॅक्ट क्लब या आंतरराष्ट्रीय युवा चळवळीच्या चोपडा ब्रँचच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण मोठ्या थाटात नुकताच आनंदराज पँलेस येथे संपन्न झाला. मावळते अध्यक्ष सागर नेवे यांनी नूतन अध्यक्ष डॉ ललित चौधरी यांना तर मावळते सेक्रेटरी दिव्यांक सावंत यांनी नूतन सेक्रेटरी प्रणय टाटीया यांना पदभार सोपविला. जावेद शेख नवे उपाध्यक्ष तर मयंक जैन कोषाध्यक्ष असतील.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोपाळ चे प्रांतपाल धीरेन दत्ता व माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी बापूजी काँम्प्लेक्स येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा कार्यालयाचे उद्घाटन व परिसरात व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम प्रा.अरुणभाई यांचे शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी रोटरी चे मावळते/नूतन अध्यक्ष द्वय पूनम गुजराथी व नितीन जैन तसेच सेक्रेटरी द्वय अनिल अग्रवाल व धीरज अग्रवाल आदी पदाधिकारी, मोठ्या संख्येने रोटरी कुटुंबीय व नागरिक हजर होते. चोपडा शाखेच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सतत क्रियाशील राहण्याची ग्वाही नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. प्रांतीय स्तरावरील पूर्वाश्रमीचे मानाचे स्थान पुन्हा प्राप्त करुन चोपडा शहराच्या गौरवात भर घालण्यास कटिबद्ध असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. समाजातील सर्व थरातून युवा टीम चे अभिनंदन होत आहे.